सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : रशियाने युक्रेनविरूध्द युध्द पुकारले असतांना महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थीनी युक्रेनमधील एका शहरात अडकले आहेत.त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. दिव्यानी सुरेश बांबोळकर आणि स्मृती रमेश सोनटक्के अशी या विद्यार्थिनीचे नावे आहेत.दोघेही राजधानी शहरापासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या विनितसिया येथील विनितसिया नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. दिव्यानी एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला आहे तर स्मृती पहिल्या वर्षात आहे.दिव्यानी ही विनितसिया शहरात एका खोलीत तिच्या मैत्रिणींसोबत राहते.तर दुसरी वसतिगृहात राहत आहे.या शहरातील परिस्थिती इतकी वाईट नाही.मात्र गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे स्मृती सोनटक्के यांनी 4 मार्चसाठी विमानाचे तिकीट काढले होते.परंतु युद्ध सुरू झाल्याने शहरातील सर्व विमाने बंद आहेत. तसेच दि.24 फेब्रुवारीला र्विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी युक्रेनला घेऊन जाणाऱ्या कंत्राटदाराने विद्यार्थ्यांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा संदेश देण्यात आले.त्या नुसार त्यांनी सर्व वस्तू जमा करून ठेवल्या आहेत.पण शहरातील परिस्थिती बिघडल्याने आणि विमाने बंद पडल्याने वसतिगृहातील सर्व विद्यार्थी भयभीत झाले आहेत.या संदर्भात विद्यार्थी आणि त्याचे कंत्राटदार भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याची माहीती प्रा. रमेश सोनटक्के यांनी दिली आहे. दोन्ही विद्यार्थी सुखरूप असले तरी युद्धामुळे पालकांची चिंता वाढली आहे.युद्धाच्या पार्श्वभूमीवर विनितसियालशहरात दररोज सायरन वाजविला जातो आणि पोलिसांनी युक्रेनियन नागरिक आणि महाराष्ट्रातील विद्यार्थींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.व त्यांना आपल्या मायदेशी परतण्यास सांगितले आहे.