महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : किराणा दुकानातून वाईन विक्रीला विरोध दर्शविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठी निघालेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक तालुक्यातील नंदोरी येथे प्रसिद्ध सप्तखंजेरीवादक आणि प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.नंदोरी येथील किसानपुत्र शेतकरी समूहाच्या शेतात पार पडलेल्या बैठकीत किराणा दुकानातून वाईन विक्रीला कडाडून विरोध करण्यात आला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात दुकानातून वाईन विक्रीला विरोध दर्शविण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर निवेदने सादर करुन सदर निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येईल. निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.बैठकीला सत्यपाल महाराज,भाऊसाहेब थुटे, गुरुकुंज गुरुकुल मोझरीचे संचालक रवीजी मानव, ज्ञानेश्वर रक्षक,उदयपाल महाराज, डाॅ.अंकुश आगलावे, चंद्रकांत गुंडावार,काळे गुरुजी,वैद्य गुरुजी, नरेंद्र जीवतोडे, अर्चना जीवतोडे व सर्व सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.