विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कानडी, मोझर, शिवारात हातभट्टीची जंगलामध्ये दारू काढण्याचे काम चालू असल्याने पोलीस ला सुगावा लागला. पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे यांनी आपल्या पोलीस साथीदाराला घेऊन गाव जवळ केले असता .जंगलामध्ये हात भट्टी दारूचा कारखाना जोमात सुरू होता. आरोपींना सुगावा लागताच त्यांनी पळ काढला परंतु घटनास्थळी डब्यामध्ये ते भिजत असलेले मोह आणि दारूचे साहित्य सर्व पोलिसांनी तोडफोड करून नष्ट केले. या कारवाई दरम्यान पिंजर पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक करुणा माहुरे मॅडम, पो. हेड राजू वानखडे, अशोक देशमुख, सतीश कथे, चंद्रशेखर गोरे, यांनी कारवाई केली.
आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.