किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : माजी सैनिक संघटना तसेच तपे हनुमान व्यायाम शाळेच्या संयुक्त विद्यमाने सत्कार सोहळा संपन्न
शहरातील तरुण युवकांनी मेजर गणेश बोचरे यांची प्रेरणा घेऊन देशसेवा करण्याची गरज पातूर पोलिस स्टेशन ठाणेदार हरीश गवळी यांचे प्रतिपाद पातूर शहरातील अतिशय सामान्य कुटुंबातून देश सेवा करण्याची तळमळ असणाऱ्या गणेश बोचरे हे सुरुवातीला सशस्त्र सीमा बल या सैन्यदलात आपली सेवा देत असताना त्यांना देशातील सीमावर्ती भागातील अतिशय महत्त्वाच्या व संकट काळी देश सेवेकरिता एन एस जी ब्लॅक कमांडो देशातील महत्त्वाची असून या सैन्यदलामध्ये मेजर गणेश बौचरे यांची चार महिन्याच्या कालावधीचा अतिशय सुईच्या नोका प्रमाणे होत असलेल्या ट्रेनिंग हे मेजर गणेश बोचरे यांनी सहज यशस्वी रित्या पार पाडून या महत्त्वाच्या बटालियनमध्ये आपल्या नावाची नोंद करण्याचा बहुमान मिळवला त्यामुळे मेजर गणेश बोचरे यांच्या या कामगिरी बद्दल संपूर्ण शहर व तालुक्यात प्रशंशा होत आहे व या कार्यक्रमामध्ये तरुण युवकांना महत्त्वाच्या व गुन्हेगारी तून वाचण्याच्या सूचनापर मार्गदर्शन भाषणामध्ये तरुण युवकांनी मेजर गणेश बोंचरे यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून देशसेवा करणे काळाची गरज असल्याची उपस्थित तरुणांना पातूर पोलिस निरीक्षक ठाणेदार हरीश गवळी यांनी मार्गदर्शनपर संदेश तरुण युवकांना दिला त्याकरिता माजी सैनिक संघटना तसेच तपे हनुमान व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पातुर येथील ऐजूव्हिला पब्लिक स्कूल च्या प्रांगणात मोठ्या भव्य स्वरूपात पातूर शहरातील विविध संघटनांच्या माध्यमातून एनएसजी कमांडो गणेश बोचरे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पातुर ठाणेदार हरीश गवळी, प्रमुख उपस्थिती वन विभाग मुख्य अधिकारी धीरज मदने , माजी सैनिक संघटना अध्यक्ष तुकारामजी निलखन, अरुण राऊत, देविदास निमकंडे अंबादास टंपे, प्रशांत निलखन, गोपाल हरणे, डिगांबर गाडगे , वसंता बंड, रवी श्रीनाथ, गणेश इंगळे, अनिल ठाकरे व सर्व इतर आजी-माजी सैनिक उपस्थित होते व या वेळी तपे हनुमान व्यायाम शाळेचे संयोजक बालू भाऊ बगाडे व इतर व्यायाम शाळेतील पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थित होती, पत्रकारानं मधून ज्येष्ठ पत्रकार राजाराम देवकर यांनी मेजर गणेश बोचरे यांना शाल देऊन सत्कार केला तर कार्यक्रमाची सूत्रसंचालन पत्रकार प्रदीप काळपांडे यांनी केले व आभार निलेश गाडगे यांनी मानले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता ऐजूव्हिला पब्लिक स्कूलचे मुख्य संचालक निलेश गाडगे भोजराज सिंह बायस , शंकर बोचरे, आजी-माजी सैनिक संघटना तसेच तपे हनुमान व्यायाम शाळेच्या सदस्यांनी श्रम घेतले