विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : अकोला पंचायत समितीच्या सभेने पंचायत समितीत सरपंच कक्ष स्थापन करण्यात यावा या ठराव सर्वांनी एकमताने मंजूर करून ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींना हक्काची जागा उपलब्ध करून दिली. देवळी येथील सरपंच सौ वैशालीताई विकास सदांशिव यांनी २ फेब्रुवारी रोजी मा. पं. स. सभापती राजेश वावकार यांना दिलेल्या निवेदनातून अकोला तालुक्यातील सर्व सरपंचांना अकोला पंचायत समितीत होत असलेली व्यथा मांडली. सोबतच निवेदनात असेही मांडण्यात आले की महिला सरपंच ह्या ५०% असतांना या महिला सरपंचांना तासंतास पंचायत समितीच्या आवारात ताटकळत उभे रहावे लागते तेव्हा त्यांना ज्या अडचणी येतात त्या सांगणे शक्य नाही व आपण स्वतः लोकप्रतिनिधी असल्याने आमच्या भावना आपण समजू शकता त्यामुळे आपण पंचायत समिती अकोला येथे प्रशासकीय बाबींसाठी किंवा मिटींगला आलेल्या सरपंच महोदयांना बसण्याची व वेळेवर प्रस्ताव लिहण्यासाठी एक स्वतंत्र “सरपंच कक्ष” उपलब्ध करुन द्यावा. आज पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे पं. स. सदस्य अजय शेगावकर यांनी वेळेवर येणाऱ्या विषयात सदर मुद्दा मांडला व या विषयाला वंचित बहुजन आघाडीच्या पं. स. सौ. मंगलताई शिरसाट यांनी अनुमोदन दिले असता सभागृहात हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पंचायत समिती हि ग्रामपंचायतचे कामकाज पाहणारी स्वराज्य संस्था आहे त्यामुळे सरपंच व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींना नेहमीच पंचायत समितीमधे गावातील प्रश्न व गावविकासाच्या कामांसाठी यावे लागते पण ज्यांच्यासाठी हि संस्था अस्तित्वात आली त्यांनाच कुठे बसण्याची सोय नाही पण अकोला पंचायत समितीनी आज मंजूर केलेला हा सरपंच कक्षाचा ठराव कदाचित महाराष्ट्रातील पहिला ऐतिहासिक ठराव असु शकतो. ह्या ठरावानुसार देवळी येथील सरपंच सौ वैशालीताई विकास सदांशिव यांच्या मागणीला यश आले असे म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही. या सरपंच कक्षाचे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने स्वागत केले आहे.