महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.२१:-येथील शहर भाजपा आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विश्वकर्मा मंगल कार्यालयात नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपुर द्वारा आयोजित भारतीय जनता पार्टी भद्रावती शहर व पतंजली योग पीठाच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात योग प्रशिक्षक शरद लांबे, नंदकिशोर खाडे व ऋषिकेश बांगडे यांचा सत्कार करण्यात आला. या योग शिबिराला भाजपा शहर महामंत्री किशोर गोवारदीपे, सुनंदाई माणूसमारे, अनिल पिट्टलवार, इम्रान खान, विशाल ठेंगणे, सुधीर काळे,सुनील खारकर, निशांत देवगडे, शत्रुघन पुल्लरवार, गजानन बोढाले, सचिन तितीरमारे,प्रशांत दोडके, युगेश खोब्रागडे, शोभाताई देशमुख, कुंताताई विधाते, जुमनाके ताई व, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


