शौचालयाची बांधकाम प्रकरण गेले होते न्यायालयात.
चामोर्शी माल ग्रामपंचायतीचा प्रकार.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी.
गडचिरोली:- आरमोरी तालुक्यातील चामोर्शी या गट ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या वनखी येथील रंजना भाग्यवान राऊत या महिलेला शौचालयाची रक्कम 12 हजार रुपये तब्बल दोन वर्षांनंतर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आणि शेवटी महिलेला न्यायालय मार्फतच न्याय मिळाल्याची घटना नुकतीच घडली. सविस्तर वृत्त असे की आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल ग्रामपंचायत अंतर्गत वणखी येथील रहिवासी व ग्रामपंचायत चामोर्शी येथे मोडत असलेल्या गाव या गावातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थी महिला रंजना भाग्यवान राऊत यांनी ग्रामपंचायतला शौचालय बांधकाम साठी अर्ज केलेला होता व सदर अर्ज मंजूर झाले.यादीत रंजना राउत यांचे नाव सुद्धा आले परंतु दुर्दैवाने त्यांचे पती नामदेव राऊत हे दिनांक 14 सप्टेंबर 2004 रोजी मरण पावले नंतर काही दिवसांनी रंजनाने भाग्यवान राऊत व वणखी यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर शौचालय बांधकाम सदर महिलेच्या नावे आधीच मंजूर असल्यामुळे सन 2016 -17 व्या वर्षात बांधकामासाठी निवड असल्यामुळे त्यांनी सरपंच व सचिव यांच्या आदेशानुसार शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले.सदर शौचालयाच्या बांधकामास जवळपास 18 ते 20 हजार रुपयांचा खर्च त्या महिलेने केले शौचालय शासनाकडून असल्यामुळे त्यांनी शौचालय बांधकामाची रक्कम बारा हजार रुपये ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांच्याकडून मिळावी यासाठी वारंवार विचारणा केली परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती आरमोरी व मुख्य कार्यपालन अधिकारी गडचिरोली तसेच जिल्हा परिषद सदस्य मनीषा दोनाडकर यांना सुद्धा ही विनंती केली की शौचालय ची रक्कम देण्यात यावी म्हणून परंतु तिच्या या अर्जाकडे कानाडोळा करण्यात आला.आणि मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दिलेल्या अर्जानुसार पंचायत समिती स्तरावर सदर बांधकामाची चौकशी करण्यात आली आणि चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले.सदर अहवाल हा सादर करते वेळेस अहवालामध्ये सदर महिलेचे बांधकाम शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे निष्पन्न झाले मात्र सदर ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच सचिव यांनी लाभार्थ्यांनी दुसरा विवाह केला असल्यामुळे व पतीच्या पहिल्या पतीच्या नावाचे दस्तऐवज उपलब्ध नसल्याचे कारण सांगून अनुदान देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप लाभार्थी व त्याचे वकील यांनी केला सदर प्रकरणात त्या बाबतीत सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले.त्यावरून लाभार्थ्यांना आधार कार्ड उपलब्ध असल्यामुळे सांगितले तसेच पहिल्या पतीचा मुलगा सुनील नामदेव राऊत यांनी शौचालय बांधकाम करण्यास तयारी दर्शवली परंतु ती अतिशयोक्ती असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले.असे असताना दिनांक 24 एप्रिल 2018 च्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.तरी पण अनुदान देण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी लाभार्थी रंजना नामदेव उर्फ भाग्यवान राऊत यांनी अधिवक्ता निता डोंगरे यांच्या मार्फतीने 2 फ्रेब्रु 2019 ला सरपंच व सचिव यांना नोटीस पाठवून सदर अनुदान देण्यासाठी काय अडचण आहे याचे उत्तर मागितले परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.शेवटी सदर लाभार्थ्यांनी न्यायालयात प्रकरण टाकले त्यानुसार ग्रामपंचायत ग्रामपंचायत अंतर्गत दिनांक 20 आँक्टोबर 2019 च्या ग्रामसभेत विषय क्रमांक 10 ठराव क्रमांक 10/1 नुसार रंजना नामदेव राऊत आणि रंजना भाग्यवान राऊत या दोन वेगवेगळ्या महिला नसून एकच आहे त्यामुळे ग्रामसभेच्या ठरावानुसार लाभार्थ्याला शौचालयाची रक्कम बारा हजार रुपये देण्यात यावे तसेच सरपंच सचिव यांना मान्य राहील.असे तड जोडीच्या लेखाद्वारे न्यायालयाने निर्णय दिला शेवटी उशिरा का होईना दोन वर्षानंतर सदर शौचालय बांधकाम करणाऱ्या महिलेला न्याय मिळाला त्यामुळे या न्यायालयाचे त्यांनी आभार मानले सोबतच सदर प्रकरण हे जवळपास दोन ते तीन वर्षात चालल्यामुळे या प्रकरणाला एवढे दिवस लाभार्थ्याची अब्रू नुकसान झाली.त्यामुळे सदर न्यायालयाचा आधार घेत आपण सरपंच व सचिवावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती रंजना राऊत यांनी दिली आहे.


