राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा : – नुकतेच नगर पंचायतीचे सार्वत्रिक निवडणूका संपन्न झाले. राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक व माजी नगर सेवक सतीश भोगे व त्यांची पत्नी पद्ममा भोगे रविवार 2 जानेवारी रोजी अहेरीच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना पक्षात प्रवेश केले.
शिवसेना अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली भोगे दांम्पत्य शिवसेनेत प्रवेश घेतले असून शिवसेना युवतीसेना उपजिल्हा अधिकारी नौरास रियाज शेख यांनी पद्ममा भोगे यांच्या हाताला शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात विधिवत व रीतसर प्रवेश करवून शिवसेना पक्षाच्या पुढील कार्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिले. यावेळी शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, विलास सिडाम, बिरजू गेडाम, राजू येनगंटीवार, बाल्या ओडेट्टीवार, महेश मोहूर्ले आदी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सिरोंचा नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला राखीव जागेतून येत्या 18 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सतीश भोगे यांची पत्नी पद्ममा भोगे शिवसेनेत प्रवेश केल्याने एक दमदार व उमदा चेहरा शिवसेनेला प्राप्त झाले असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युतीचे उमेदवार पद्ममा भोगे यांचे प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला राखीव जागेतून नक्कीच जिंकून येणार असा आशावाद शिवसेनेचे अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख बोलून दाखविले.











