अकोला,दि.२४ – ग्राहकाचे सर्वोच्च हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 पारित केला आहे. ग्राहकांचे कोणत्याही प्रकारची फसवणूक, भ्रामक जाहिरातीला बळी न पडता ग्राहकांनी जागृत राहून स्वत:च्या हक्कासाठी लढा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ निमित्त कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी बि.यु.काळे, जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष ॲड. एस.एम. उंटवाले, अखिल भारतीय ग्राहक मंच अध्यक्ष मनोहर गंगाखेडकर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण संस्थाचे संजय पाठक आदि उपस्थित होते.
ॲड. एस.एम. उंटवाले यांनी ग्राहकांचे हक्क, सरंक्षण, हक्काविषयी तसेच शासनाने नवीन ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी, ग्राहकांच्या ऑनलाईन व जाहिरातीव्दारे होणाऱ्या फसवणूकीबाबतच्या तक्रारीचे निवारण कशा पद्धतीने करायच्या याबाबत मार्गदर्शन केले. सिलेब्रीटीव्दारे करण्यात येणाऱ्या भ्रामक जाहिरातीला या कायद्यान्वये आळा घालण्याचे काम केले आहे. कोणत्याही क्रेता ग्राहकांची फसवणूक होणार नाही झाल्यास अशासकीय सदस्य, संबंधित शासकीय कार्यालय व ग्राहक आयोगाकडे दादा मागू शकतो. नवीन कायद्यानुसार आता स्थानिक स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करता येणार आहे. ग्राहकांनी वस्तु खरेदी करताना वस्तुवरील अटीशर्ती, सूचनाचे पालन करुनच खरेदी करा, तरीही फसवणूक होत असल्यास ग्राहक आयोगाकडे दाद अवश्य माग, असे आवाहन ॲड. एस.एम. उंटवाले त्यांनी यावेळी केले.
यावेळी महिला व बालविकास विभागाव्दारे जिल्ह्यातील अनाथ बालकांचा शोध घेवून शिधापत्रिकासाठी आवश्यक कागदपत्रे पुरवठा विभागात जमा करुन त्यांचे पिवळी शिधापत्रिका तयार करण्यात आले. त्यांना आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे हस्ते शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनजागृती लोकनाट्य मंडळ संस्थामार्फत लोकगीतव्दारे ग्राहक जनजागृती केले.
जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी प्रास्ताविकमध्ये ग्राहकाचे हक्क व फसवणूक झाल्यास करावयाची कार्यवाहीबाबत माहिती दिली. तर सुत्र संचालन लवाळे यांनी केले.