सतिश मवाळ
ग्रामीण प्रतिनिधी कासारखेड
सगळ्या गावांमध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल तर….बांध. एकरभर पडीक पडलेली असते ती कसायला मनुष्यबळ नाही. वेळही नाही. पण पठ्ठ्याला शेजारच्याचा बांध कोरायला फार वेळ असतो. मला अजुनही समजलंच नाही की या बांधात काय अडकलेलं असतं. एक पाभार दोन पाभार जास्तीत जास्त एक गुंठा लुबाडली…तर किती उत्पन्न निघत असेल… पण माणुस तो भावाचा, भावकीचा बदला घेतल्याशिवाय चैन नाही. एकाच आईबापाच्या~वाडवडिलांच्या पोटी जन्म घेतलेला कट्टर शत्रू बनतो…अन एक भला बांध दोघांमध्ये निर्माण होतो..असे अनेक बांध आयुष्यात असतात. बरं बांध कोरला तरी ७/१२ वर क्षेत्र आहे तसंच असतं ना…शहाण्या माणसांचे बांध चार~दोन फुटांनी आत आलेत…आणि या गोडबोल्यांचे (काखेत छुरी मुॅंह में राम) म्हणणार्यांचे बांध तितकेच फुगलेत…त्या पठ्ठ्यांना ते कुठं उमजतय…लोकांच्या जमीनी कोरुन करोडपती झाल्याची एकतरी बातमी कधी ऐकलीय का? पण आम्ही दळभद्री माणसं बांध कोरायचे बंदच नाहीत. माझी दहा एकर…पंधरा एक…नुसत्या बाता ऐकायच्या. या मायभुमीवर किती आले आणि किती गेले ती आहे तशीच जागेवर आहे. आपण फक्त गमजा मारायच्या….याच मायभूमीनं जन्माला घातलं…वाढवलं… पालनपोषण केलं….आणि शेवटी स्वतःमधे सामावुन घेतलं. डोळ्यादेखत मी मी म्हणणारे वाघासारखे डरकाळ्या फोडणारे अक्षरशः धुळीला मिळाले..पण आम्ही मात्र तसेच …काहीच फरक नाही…दोन दिवसाचं तारुण्य ,शक्ती संपली की मग ताळ्यावर येतो..बांध कोरणारांनी बंगले बांधले नाहीत..अलिशान गाड्या घेतल्या नाहीत कारण ज्यांनी बंगले बांधले , अलिशान गाड्या घेतल्या..,त्यांना काहीतरी साध्य करण्याच्या नादात बांध कोरायला वेळच नव्हता…आणि त्यांची ती नियतही नव्हती! असे काही लोक असतात
असं म्हणतात की ते बीझी असतात ध्येय प्राप्तीसाठी.. पण इथं बांध कोरणारे कधीकधी भाकरीला महाग असतात…हे यंदाच्या पावसाळ्यात पाहायला मिळाले कारण अति पाऊस झाल्याने शेतामध्ये बांध नसल्याने अणेकाच्या जमीन खरडून गेल्या आहेत.त्यामुळे अतोनात नुकसान झाले.आता तरी शेतामध्ये बांध ठेवावे तुमच्या मुळे दुसऱ्या चे नुकसान होणार नाही एवढी च काळजी घ्यावी


