तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सीडीएस रावत गंभीर जखमी झाले आहेत. तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत त्यांची पत्नी, पायलट यांच्यासह 9 जण त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.