महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.८:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भद्रावती येथील माना जमात बांधवांकडून अभिवादन करण्यात आले.येथील जुने बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख देविदास जांभुळे,प्राचार्य दामोधरराव दोहतरे,अध्यक्ष संजय गायकवाड, सचिव शामराव दांडेकर, देवराव घरत, शंकरराव गरमडे, पांडुरंग श्रीरामे, किशोर चिकटे आदि जमात बांधव उपस्थित होते.











