किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिर्ला ग्रामपंचायत वार्ड क्र.1 मधिल वाल्मिकी समाजाची स्मशानभुमी आहे.शहरातील नागरिकांच्या टाकाऊ कच-याने स्मशानभूमीचा परिसर अतिशय वाईट अवस्थेत असुन संपूर्ण देशात हा समाज स्वच्छते करिता नगरपरिषद,जिल्हा परिषद,महानगरपालिका यामध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नेहमी आपली भूमिका गेल्या अनेक वर्षांपासून मोलाची भुमिका बजावत आहे.अशा पातूर नगरपरिषद अंतर्गत स्वच्छतेचे काम करणारे कामगार यांची ही स्मशानभुमी नगरपरिषद कार्यालय पासुन काही अंतरावर असुन मरणासन्न अवस्थेत आहे. नगरपरिषद व ग्रामपंचायत यांच्या सिमा वादात येथे विकास कामांमध्ये बाधा येत आहे. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रामुख्याने स्वच्छतेवर व विकास कामावर भर देत आहेत,त्यांनी वाल्मिकी समाजाचा देशाच्या स्वच्छतेसाठी सिंहाचा वाटा असल्याचे बोलून मागील वर्षी काही स्वच्छता कामगारांचे पाय धुऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान करून चांगला संदेश दिला होता. अशा समाजातील व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचा अंत्यविधी चांगल्या प्रकारे स्वच्छ वातावरणात व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून होत असलेल्या त्यांच्या मागणीकडे लक्ष वेधून पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस व किरणकुमार निमकंडे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्याशी याबाबत चर्चा करून माहिती दिली व यावेळी वाल्मिकी समाजाचे विशाल तेजपाल ,, विनोद तेजवाल यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी करून ठाकूर शिवकुमार सिंह बायस त्यांनी वाल्मिकी समाजाच्या स्मशानभुमी ची झालेली दयनीय अवस्था सुधारण्यासाठी जिल्हा अधिकारी मीना अरोरा यांना विनंती केली.