सतीश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यातील अंत्री देशमुख : येथे दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मेहकर यांच्या वतीने जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मृदा अर्थात मातीचे पूजन करून मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गिन्यानराव देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी मिसाळ , तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी सहाय्यक मेहत्रे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी माती, मातीचे संवर्धन, मातीची धूप रोखणे आणि मातीचे प्रदूषण टाळणे इत्यादी बाबीचे सखोल मार्गदर्शन केले.. याप्रसंगी ,सन्मानिय संदीप देशमुख, प्रफुल्ल देशमुख, शंकर देशमुख, अभिमन्यू देशमुख, सुनील देशमुख, संतोष देशमुख, डीगांबर सरकटे,गंभीरराव देशमुख, दिलीपराव देशमुख, गोपीचंद देशमुख, कैलास देशमुख, प्रसाद देशमुख, सुनील देशमुख,अरुण देशमुख, सतीश देशमुख,बाळू ठाकूर रहीम शहा, राम गिरी, प्रताप मोरे, माधव देशमुख,बाळू येवले, रामेश्वर देशमुख, दिलीप दळवी, एकनाथ गिरी, माऊली देशमुख विलास देशमुख ,कृषि मित्र सुनील देशमुख, रमेश येवले आदी ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी के देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक विठ्ठल लहाने यांनी केले.











