किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : शिर्ला (अंधारे )येथील हनुमान मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधिदिनी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली.
व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. रामभाऊ कठाळे महाराज यांनी केले. विनोद पातुरे, अरुण अंधारे, उकर्डा ढाळे धोंडुजी बळकार आणि हरिपाठ मंडळातील महिला आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. याप्रसंगी सौ मीराताई राऊत यांचे वतीने पं श्रीराम शर्मा आचार्य यांनी लिहिलेल्या अध्यात्मिक ग्रंथांचे तसेच श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे वतीने ,प्रा. सुरेश कुळकर्णी संपादित पसायदानामृत मासिकाचे पारायणात सहभागी झालेल्यांना वितरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे, वीर पिता काशीराम निमकंडे, सौ मिराताई राऊत, निळकंठराव अंधारे, रामकृष्ण खंडारे, नामदेव गाडगे, सुहास कोकाटे आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.











