अकोला,दि.30 – निवडणूक आयोगाने रद्द केलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे कामे शुकवार दि. 3 डिसेंबरपासून सुरु होईल तर 28 जानेवारी 2022 रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित तसेच आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत घोषीत केलेला कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द करुन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे.
प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम
- शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी तहसिलदार यांनी गुगलअर्थचे नकाशे अध्यारोपीत (super impose) करुन प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे.
- गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करणे.
- सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करणे. तसेच समितीमध्ये गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल.
- गुरुवार दि. 16 डिसेंबर रोजी समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्येतेसाठी सादर करणे.
- मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी नमुना ‘ब’ ची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करणे व मान्यता देणे.
- शुक्रवार दि. 24 डिसेंबर रोजी दुरुस्त्या अंतर्भूत करुन प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणाला(अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील माहिलांसह) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी.
- सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे.(आरक्षणाची सोडत काढणे)
- शुक्रवार दि.31 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे.
प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे
1. सोमवार दि. 3 जानेवारी 2022 रोजी तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहिर सूचना प्रसिद्ध करणे.
2. सोमवार दि. 10 जानेवारी रोजी प्रारुप प्रभाग व रचनेवर हरकती सादर करणे.
3. बुधवार दि.12 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे.
4. बुधवार दि. 19 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सुचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे.
5. सोमवार दि. 24 जानेवारी रोजी आलेल्या प्रत्येक हरकती व सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे.
उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी प्रभाग रचना व आरक्षणाला शुक्रवार दि. 28 जानेवारी 2022 रोजी अंतिम मान्यता देणे. तसेच मान्यता प्राप्त अंतिम प्रभाग रचनेला बुधवार दि. 2 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध देण्यात होईल.