गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव रमाई महिला संघाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला तथा रमाई महिला संघ अध्यक्षा रंजना वानखडे यांनी भारतीय घटनेचे थोर शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हारार्पण करून वंदन केले सोबतच रमाई महिला संघाच्या
सदस्य कौसल्याबाई वानखडे, रत्नाबाई गवारगुरु संगीता वानखडे .नर्मदा बोडदे ,पंचफुला वानखडे .रेखा वरठे .प्रिया वरठे आशा वानखडे. वंदना वानखडे. सिंधुबाई वानखडे .मालू वानखडे.नर्मदा तायडे .इंदुबाई वानखडे, चंद्रकलाबाई तायडे, साधना विरघट, सविता वानखडे, बबिता वानखडे संजय वानखडे चंदा वानखडे गावातील नागरिक समाधान विरघट डिगांबर तायडे इत्यादी उपासक उपासिका हारार्पण करून महामानावास वंदन केले.सदर कार्यक्रमास रमाई महिला संघाच्या अध्यक्षा रंजना वानखडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीबाबत माहिती दिली भारतीय राज्य घटना कशी उदयास आली, राज्य घटनेत कोण कोण सदस्य होते, बाबासाहेबांचा संविधान निर्मितीत कसा सिंहाच वाटा आहे याची मिमांसा केली. कार्यक्रम यशस्वीतेस सुरेश वानखडे.संदेश वानखडे.उमेश तायडे.दिनेश वानखडे . रविंद्र वरठे. पंडित गवारगुरु.शुध्दोधन वानखडे.
यांनी परिश्रम घेतले.