अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव : शहराला कुरळा येथुन पाणी पुरवठा होतो.पाण्याअभावी व वाढत्या मालेगाव शहराला कुरळा येथील पाणी कमी पडत असल्यामुळे चाका तीर्थक्षेत्र वरुण नव्याने तात्पुरता पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला परंतु नगर पंचायतच्या गलथन कारभारामुळे वाटर फिल्टर प्लांट बंद असल्यामुळे मालेगांवकरानां नळाच्या दुषित पाण्यावरच दैनदिन भागवावी लागत आहे. दुषित पाणी पिण्यायोग्य नसले तरी ते पाणी प्यावे लागत आहे. कित्येक वर्षापूर्वीपासून ‘ मालेगाव शहरात दुषित पाण्याची समस्या आणि नळाला येणारे पाणी अत्यंत दुषित असल्यामुळे तेच पाणी उपयोगासाठी स्वयंपाकासाठी विशेषतः पाण्याचा वापर करणे आरोग्याला हानीकारक ठरत आहे. वारंवार नागरिक नगर पंचायत प्रशासनाला साकडे घालतात.मात्र कुणीही याकडे लक्ष घालत नाही.सध्या शहरात पस्तीस कोटीच्या पाईप लाईन ३ वर्षा पासुन मंजुर झाली असून अध्याप ती कधी सुरु होनार हे मात्र गुलदस्त्यात आहे नविन पाईपलाईनचे काम कधी सुरू होनार हे न उलगनारे कोडे असून नगर पंचायत चे गढुळ पाणी नागरिकांना अजून किती दिवस प्यावे लागणार आणि प्रशासन कधी कुंभकर्णी झोपेतून जागे होईल असा प्रश्न नागरिकांकडून केला आहे.