विविध दिग्गज सिनेकलाकांराच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
नुकत्याच झालेल्या अकोट येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुमाऊली फिल्म प्रोडक्शन चे संस्थाध्यक्ष अँड संतोष खवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपती साम्राज्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील कलाकारांना सन्मानित करण्यात आले यामध्ये पातूर चे पंकज पोहरे यांना या वर्षीचा आंतरराष्ट्रीय युवा जीवनगौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध सैराट फेम अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्या यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी बबन फेम अभिनेत्री प्रांजली कांझरकर, शिवछत्रपती एज्युकेशन सोसायटीचे सुयोगजी देशमुख, दयानंद शिंदे पाटील,शिव छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्ती आशिष भोसले, महेश दादा गणगणे, नायब तहसीलदार राजेश गुरव, ठाणेदार प्रकाश जी अहिरे, नितीन देशमुख, ठाणेदार ज्ञानोबा फड, पंकज पाल महाराज, सिने अभिनेत्री शेख मुस्कान,आशिष भटकर, वैभव टेंभुर्णे इत्यादी नवोदित सिनेकलावंत व शेकडो कलाकारांच्या उपस्थितीमध्ये पंकज पोहरे यांना सन्मानित करण्यात आले व त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.