बाबासाहेब खरात
अंबड तालूका प्रतिनिधी
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मार्केट यार्ड शाखा अंबडचे व्यवस्थापक बाबासाहेब भागुजी शरणागत यांचे गुरूवारी (दि.10) दुपारी 5 वाजता औरंगाबाद येथे एका रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते 53 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 3 मुले,3 भाऊ असा परिवार आहे.
बाबासाहेब शरणागत यांनी जिमस बँकेच्या तिर्थपुरी, मंगरूळ, ताडहादगांव व अंबड येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. दुष्काळ अनुदान व पीक विमा अनुदान प्रक्रियेत शेतकर्यांना त्रास होवू नये, म्हणून स्वतः रात्रीपर्यंत थांबून बँकेचे काम उत्तमरित्या केले. ते मुळ मंगरूळ खरात (ता.घनसावंगी) येथील रहिवाशी होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथे शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.