अभिजीत फंडाट प्रतिनिधी
अकोला-भारतीय जनता पार्टी च्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकार ला 07 वर्ष पूर्ती व केंद्रीय मंत्री अकोला लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार ना.संजयभाऊ धोत्रे यांच्या मंत्री पदाचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भाजप अकोला तर्फे आशा वर्कर्स चा साडीचोळी देऊन सत्कार कार्यक्रम व अकोला शहरातील नागरिकांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढण्याच्या कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री ना.संजय धोत्रे,अकोला पूर्वचे आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर,अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा,महापौर अर्चनाताई मसने,महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल,महानगर संघटन सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर,सरचिटणीस संजय गोडा,डॉ.विनोद बोर्डे,संजय गोटफोडे,संजय जिरापुरे यांच्या मार्गदर्शनात महानगरातील प्रत्येक मंडळात आशा वर्कर्स चा सत्कार व नागरिकांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा कॅम्प चे आयोजन करण्यात येत आहे आज पूर्व मंडळातील स्थानिक प्रभाग क्रमांक 3 मधील न्यू तापडिया नगर मध्ये करण्यात आले होते.
यावेळी आ.रणधीर सावरकर यांनी आशा वर्कर्स च्या कामाचे कौतुक करत मानवसेवा हीच ईश्वर सेवा असून भाजप चा कार्यकर्ता आशा वर्कर्स मध्ये देवाचे रूप पाहतो आहे आणि त्यांनी केलेल्या बहुमोल कामामुळे कोरोनाचे संकट अकोला जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात का होईना कमी करण्या करता मोलाची साथ मिळाली आहे त्यांच्या या विधायक कामामुळे आशा वर्कर ची प्रतिमा ही समाजात मोठ्या प्रमाणात अभिनंदनीय झाली आहे व त्यांच्या समस्यांना घेऊन येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करण्याचे आश्वास यावेळी आ.सावरकरांनी दिले.
महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी भाजप च्या मागील 05 वर्षाच्या काळातील कामांबाबत माहिती व सेवा कार्याबाबत माहिती उपस्थित नागरिकांना दिली व या पुढील काळात देखील भाजप चा सामान्य कार्यकर्ता नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध राहील असे ही विजय अग्रवाल म्हणाले.
यावेळी भाजप पूर्व मंडळ तर्फे नव निर्वाचित संघटन सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर व संजयजी गोटफोडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी कार्यक्रमास महापौर अर्चनाताई मसने,महिला आघाडीच्या अध्यक्षा चंदाताई शर्मा नगरसेविका गीतांजलीताई शेगोकार,सुनीताताई अग्रवाल,नीलिमाताई वोरा,सारिकताई जयस्वाल,डॉ.किशोर मालोकार,जयंतराव मसने,मंडळ अध्यक्ष देवाशिष काकड,पागृत काका,नगरसेवक हरीश काळे,सागर शेगोकार,रुपेश जयस्वाल,प्रशांत अवचार,सुभाष खंडारे,जस्मितसिगजी ओबेरॉय,शीतलकुमार जैन,पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे,आकाश ठाकरे,अभिजित कडू,पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष केशव हेडा,अक्षय जोशी,शुभम चंदन,अतुल गोंधळेकर,उमेश श्रीवास्तव,रवी यादव व समस्त कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.