अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना काळामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या सुरक्षा आणि सन्मान करिता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पातुर तालुका बैठक प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, सिध्दांर्थ तायडे (विभागिय अध्यक्ष) संदिप पांडव (विदर्भ), जिल्हा अध्यक्ष गणेश सुरजुसे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार राजाराम देवकर ,अब्दुल कदीर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये 10 जून रोजी पातूर येथील पत्रकार संघटनेचे सचिव प्रा. सि.पी. शेकूवाले यांचे निवासस्थानी पार पडली या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे ,पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, राजाराम देवकर , अब्दुल कदीर, श्रिधर लाड ,नासिर शेख ,विजय सरदार ,रमेश निलखन यांनी विचार व्यक्त केले.या बैठकीमध्ये गणेश सुरजुसे राजाराम देवकर ,अब्दुल कदीर यांचा सत्कार पातुर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे कार्य केले आहे अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्याचे ठरले तर पत्रकारांच्या सुरक्षेकरिता त्यांना हेल्मेट देण्याची व्यवस्था तसेच कोरोना काळात कार्य करणाऱ्या पत्रकारांना कायदेशीर ओळखपत्र शासकीय प्रशासकीय पत्रकारांची संघटनेची डिक्शनरी आणि दिनदर्शिका यासह इतर सुरक्षेचे साहित्य 4 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या सन्मान सोहळ्यामध्ये वितरित करण्यात येईल यामध्ये सोशल डिस्टंसिंग आणि प्रशासनाचे नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले असून करून आला पातुर तालुक्यातून हद्दपार करण्याकरता प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करण्याचे ठरले या बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. सि. पी.शेकूवाले तर आभार प्रदर्शन पत्रकार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष संजय गोतरकर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाराम देवकर , ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर अब्दुल अजीज, श्रीधर लाड, नासिर शेख, नय्यरखान , मोहम्मद फरहान अमीन,नातिक शेख, अविनाश पोहरे,अमोल करवते, राम हरी पल्हाड, प्रा. सय्यद साजिद हुसेन ,रक्षण देशमुख ,योगेश नागोलकार, नासिर शहा राजू शहा, विजय सरदार, श्रीकृष्ण लखाडे, सुमित भालतिलक, मंगेश फाळके ,पवन तांबे ,चेतन भुजबळ, रमेश नीलखन , सतीश कांबळे, अभिजीत ताजणे, राहुल देशमुख ,प्रेमचंद शर्मा, सुधाकर राऊत आदी सन्माननीय सदस्य उपस्थित होते.











