गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
स्थानिक संत तुकाराम महाराज चौक येथील गादी भंडार सह दोन दुकानांना 8 जूनला लागलेल्या आगी मुळे 14 लाख रूपयांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई सह आर्थिक मदत मदत देण्याबाबत तसेच आग लागन्यास कारणीभूत असलेल्यानवर कारवाई करण्या बाबत तेल्हारा विकास मंचने 9 जुनला तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. 8 जून ला रात्री 9 वाजता च्या दरम्यान संत तुकाराम महाराज चौक तेल्हारा येथील हमीद खान अली खान यांच्या गादी भंडाऱवर मागील बाजूस वाऱ्या मुळे तेल्हारा बाजार समितीच्या आवारातील सुकलेल्या निंबाच्या झाडाची फांदी विद्युत तारा वर पडल्यामुळे व तो तार तुटून गादी भंडार वर पडल्यामुळे घर्षण होऊन गादी भंडार मधील रुई ला आग लागल्या मुळे रुई, मशीन व इतर साहित्य जळून खाक होऊन सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच या आगिच्या लपेटित संजय पंजाबराव देशमुख यांच्या मालकीच्या असलेल्या श्रीरामचंद्र रिवायडींग वर्क्स दुकानाला सुद्धा आग लागल्यामुळे वायरिंग मोटर पंप केबल इत्यादी संपूर्ण इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल सामान जळून खाक झाल्यामुळे सात लाख रुपये पर्यंतचे नुकसान झालेले आहे तसेच आबिद भाई यांच्या लकी बॅटरी रिवायडींग रिपेरिंग या दुकानाला सुद्धा आग लागल्यामुळे त्यांच्या दुकानातील अनेक बॅटरी जळून खाक झाल्यामुळे त्यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना विनाविलब झालेल्या नुकसानीबाबत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करून विद्युत वितरण कंपनीने लिंबाच्या झाडाच्या फांद्य वेळीच तोडल्या असत्या तर हा अपघात झाला नसता तरी शासनाने या दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी व विद्युत वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी ट्री कटिंग न केल्यामुळे झाडाच्या फांद्या तारावर पडल्यामुळे सदर दुकानांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे संबंधित दोषीन वर कारवाई करावी व दुकानदारांना झालेल्या नुकसानीबाबत नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तेल्हारा विकास मंचने तहसीलदार तेल्हारा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे या वेळी विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर , मोहन श्रीवास , संतोष राठी , सोनू सोनटक्के, नितिन मानकर , स्वप्निल सूरे , रविन्द्र वाडेकर , रवि मालवे , संजय देशमुख , प्रवीन पोहरकार , रामदास खारोडे ,हमिद खान , शे. ताजुद्दीन आदि उपस्थित होते .