अकोला : पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि कुक्कटपालन व्यवसायाकरिता किसान कार्ड योजना अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता जवळच्या राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये दि. 7 ते दि. 15 पर्यंत संपर्क साधावा. तसेच योजनेअंतर्गत व्याजदर सात टक्के असुन नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजदरात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य व कुक्कटपालन व्यवसायकांनी या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी तसेच सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (लिड) बँकचे जिल्हा अग्रेणी प्रंबधक, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक अकोला यांनी केले आहे.