गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा शहरात दोनच मुख्य चौक आहेत तरीही मात्र यावर जे वाहतूक होते त्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता न प प्रशासनाने पार्किंग पट्टे पडून देण्याचे नियम आहेत परंतु या नियमाकडे दुर्लक्ष का केल्या जात आहे.हे नियम न प प्रशासनाला माहिती नाहीत का. अशे प्रश्न जनते मधे उठायला लागले आहेत.पार्किंग पट्टे नसल्याने वाहनधारकांना सतत ची कसरत करावी लागत आहेत, सोबतच अतिक्रमना मुळे हे प्रकार घडून येत आहे.तसेच आता शाळा, महाविद्यालय व इतर ही खाजगी ट्यूशन क्लासेस सुरु झाले आहेत, तरीही विद्यार्थी वर्गाला आणि विशेष मुलींना, महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गाडी चलवतांना तर अडचन येतेच पण चौकात मूल किवा माणसे कुठेही गाडी थांबून किंवा उभी करून घोळका करून रस्त्यातच उभे असतात, याला कुठेतरी आळा घालण्यासाठी न.प प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात होणारे अपघात टाळता येणार नाहीत,
सदर प्रकरणात चर्चा केली असता तेल्हारा पोलीस प्रशासनामार्फत वारंवार नगरपरिषद येथे पार्किंग पट्ट्यासाठी किती तरी लेटर देण्यात आले आहे. परंतु सतत या समस्येकडे का दुर्लक्ष केल्या जात आहे. ही समस्या न.प प्रशासनाला एवढी लहान वाटते का.की वाहतुकीचे नियम नगरपरिषद ला माहिती नाहीत?
संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच याची दखल घ्यावी व शहरात पार्किंग पट्ट्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी तेल्हारा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.


