तर पातुर तालुका विकास मंच चे संयोजक ठाकूर शिवकुमार सिंह बायस यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील समस्यांचे दिले निवेदन
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी
साप्ताहिक अधिकार नामा पातुर
पातूर अकोला जिल्ह्यातील म्हैसपुर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त कोरोना नियमांचे पालन करत मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थीतीत ग्रामपंचायत कार्यालयात भगव्या झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले.
या छोटे खाणी कार्यक्रमात गावाला आरोग्यसेवा देणारे येथील वैद्यकीय अधिकारी,परिचारीका व आशा वर्कर यांनी सतत कार्यरत राहून आरोग्य विषयी केलेली मेहनत व गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कोरोना आजारा विषयी जनजागृती केली व लसीकरणा करिता गावातील वयोवृद्ध तसेच ४५ वर्षावरील नागरिकांना लसी चे महत्व पटवून देत म्हैसपुर हे गाव रेड झोन मध्ये असताना सुद्धा कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यास या सर्व टीम वर्क ची मेहनत असल्यामुळे ग्रामपंचायत तर्फे यांचा सन्मानचिन्ह व शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचीत सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थीती पातुर तालुका विकास मंच चे संस्थापक ठाकुर शिवकुमार बायस यांना गावातील काही प्रमुख समस्या चे निवेदन सरपंच उपसरपंच यांनी देऊन गावालगत जात असलेल्या मोरणा नदी वर कोल्हापुरी बंधारा करिता निवेदन देण्यात आले जेणेकरून गावांमध्ये पाणी व शेती बागायत करण्यास मदत होईल ठाकूर शिवकुमार यांनी निवेदन स्वीकारून बंधाऱ्याचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आपले मत व्यक्त करतांना सांगितले.
याप्रसंगी सरपंच सौ.महल्ले,उपसरपंच कृष्णा पाटील,ग्रामसेवक जाधव साहेब, ग्रामपंचायत सदस्य दिलीप वानखडे,पातुर शहर युवासेना प्रमुख योगेश फुलारी,वैद्यकीय अधिकारी डॉ.कोरडे, डॉ.ताजणे, डॉ.गायगोले, डॉ.चनखोरे,परिचारिका सौ.नवलकार, गोपाल रायकर,शाम शेळके,दत्ताभाऊ शेळके, किरण कुमार निमकंडे, महेश बोचरे,अजय अल्हाट,सुशिल ताले,शुक्लाजी व इतर मान्यवर उपस्थीत होते.


