तेहतीस फुटी सरकारी पांदन वर बांधण्यात आलेली दहा बाय सात फुट ऊंची असलेल्या मोरीचे बांधकाम पाडून त्याठिकाणी तेहतीस बाय पंधरा फुट उंचीच्या मोरीची उभारणी करा… ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांची मागणी
शेतक-यांसोबत पातुरचे तहसीलदार यांना दिले निवेदन
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी
साप्ताहिक अधिकार नामा पातुर
पातुर येथील पट्टे अमराई क्षेत्रात दसरा मैदान ते देऊळगाव हा सरकारी तेहतीस फुट रूंदीचा शेतरस्ता ( पांदनरस्ता) आहे.
या शेतरस्त्यावरून अकोला ते हिंगोली हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.शेत सर्वे क्रमांक “३०७ /१/क” या शेताजवळ राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे दहा बाय सात फुट ऊंची असलेल्या मोरीचे बांधकाम तेथून गेलेल्या या शेतरस्त्याच्या महामार्गावर केले गेले आहे.या दहा बाय सात फुट ऊंची असलेल्या मोरीतून कुठलेही वाहन जाणे अशक्य आहे
त्यामुळे शेतकरी लोकांना त्यांच्या शेतात बैलगाडी किंवा तत्सम वाहनाने ये – जा करणे,पेरणी करणे,शेतातील माल वाहनाने घरी आणने,जनावरांची शेतात ने-आण करणे कामी याठिकाणी सरकारी नियमानुसार तेहतीस फुट रूंद आणी पंधरा फुट ऊंची असलेली मोरी अथवा पुल बनविने अत्यंत गरजेचे आहे.
तेथील शेतक-यांनी पातुर तालुका विकास मंचाचे ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांना ही बाब लक्षात आणुन दिली व त्यांना याकामी मदत करण्यास सांगितले.त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पातुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार दिपक बाजड यांना ही माहिती दिली त्यांनी त्वरित मंडल अधिकारी गोपाल तळोकार व तलाठी तिवारी यांना प्रत्यक्ष त्या जागेवर पाठवले व त्यांच्या मार्फत पाहणी केली.मंडल अधिकारी यांनी ही आताचा महामार्गावर बांधलेला छोटा पुल चुकीचा आहे तो मोठा करावा लागेल अशी माहिती उपस्थीत शेतकरी व तहसीलदार यांना दिली.
तसेच यासंबधीचे निवेदन तहसीलदार यांना द्या असे सुचविले त्यानुसार यामुळे बाधीत होणारे शेतकरी लोकांनी सह्या केलेले यासंदर्भातील निवेदन तहसीलदार दिपक बाजड यांना ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांच्या नेतृत्वात शेतक-यांच्या उपस्थीतीत देण्यात आले.
कर्तव्यदक्ष तहसीलदार दिपक बाजड यांनी त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत त्यांच्या सहीचे या संदर्भातील तहसील कार्यालयाचे पत्र सोबत शेतकरी वर्गाच्या निवेदनाची प्रत राष्ट्रीय महामार्ग कार्यालय वाशीम येथे ताबडतोड पाठवून यावर लवकरात लवकर योग्य मार्ग काढण्याची सुचना केली आहे.
निवेदन देतांना ठाकुर शिवकुमारसिंह बायस,शंकर गोतरकार,शाम गाडगे, संतोष तेलंगडे, किरणकुमार निमकंडे,योगेश फुलारी, राहुल अत्तरकार, गणेश म्हैसणे व इतर शेतकरी बांधव उपस्थीत होते











