महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.१८:- येथील भारतीय जनता पक्षातर्फे देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील भारतीय जनता पक्षातर्फे स्थानिक ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील रुग्णांना फळांचे तथा बिस्किटांचे वाटप करण्यात आले. व नरेंद्र मोदीं यांच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाला भाजपचे भद्रावती शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, शहर महामंत्री कीशोर गोवारदिपे, शहर महामंत्री प्रशांत डाखरे, प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो. महाराष्ट्र अमित गुंडावार, भाजप जेष्ठ नेते अफझल भाई, वैद्यकीय अधीक्षक भद्रावती डॉ.मनीष सिंग, जिल्हा महामंत्री भाजयुमो.इम्रान खान, निशांत देवगडे, विशाल ठेंगणे, मोनू पारोधे, तेजस कुंभारे, हनुमान माणुसमारे, मधुकर सावनकर, संजय सरसेना,सुनील खारकर, अरुण पाठक, गोविंदा बिंजवे, बबलू सैय्यर, मोहन पिंपळशेंडे, सारंग मेश्राम, आशिष पोटे, गजानन कामतवार, राजेश्वर मामिडवार, प्रदीप मांडवकर,बाबू रॉय आदींची उपस्थिती होती.