शकील खान
शहर प्रतिनिधी मूर्तिजापूर
मुर्तिजापूर – पंचायत समिती मुर्तिजापूर मध्ये शिवराज्यभिषेक दिन कोरोनाच्या नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला महाराष्ट् सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे प्रत्येक जिल्हा परिषद,पंचायत समिती ,ग्रामपंचायत कार्यालयात ६ जुन रोजी सकाळी ९ वाजता शिवराज्यभिषेक ,शिवस्वराज्य दिन साजरा होत आहे. पंचायत समिती कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला हार अर्पण व पूजन करून उच्च प्रतिचा भगवी जरी पताका ध्वज उभारून , राष्ट्गित व महाराष्ट् गित घेवुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला
यावेळी पंचायत समिती सभापती उर्मिला बबनराव डाबेराव,बबनराव डाबेराव,जिल्हा परिषद सदस्या माया संजय नाईक,पं.स.सदस्य दादाराव किर्दक, पं.स.सदस्य प्रकाश वानरे,पं.स.देवाशिश भटकर ,संजय नाईक,नरेश विल्लेकर,कक्ष अधिकारी बननोरे,विस्तार अधिकारी कीर्तने,कृषि विस्तार अधिकारी ननिर यासह पंचायत समितीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते
यासह मुर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायत कार्यलयामध्ये कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला


