किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : गावातील रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिकाना होत आहे मोठी अडचण पत्रकार योगेश नागोलकार पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमार सिंह बायस यांची पुणे येथे भेट घेवून असलेल्या रस्त्याच्या परिस्थितीची केली सकारात्मक चर्चा ..
पातुर तालुक्यातील राहेर ते पिंपळखुटा या रस्त्याची झालेली दुरावस्था होवून खुप दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे..वाहन तर सोडाच पायी चालण्यासाठी पण हा रस्ता अडचणीचा झाला आहे..मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी राहेर ग्रामपंचायत तर्फे ठराव घेऊन तसा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे परंतु अद्याप पर्यंत कुठलीही दखल कुणीही घेतली नाही यासाठी तेथील रहिवासी असलेले कणखर वृत्तीचे युवा पत्रकार योगेश भाऊ नागोलकार यांनी काल पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांची पुण्यात स्नेह भेट घेवून सर्व परिस्थीतीचा आढावा दिला.त्यांनी ही यास सकारात्मकता दर्शवत यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणा-यां मध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.याप्रसंगी त्यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे मा.महापौर राहुलदादा जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून पिंपरी चिंचवड शहरात स्वागत करून यथोचित सत्कार करण्यात आला.


