मनोज भगत , ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड :- अत्यल्प खर्चात जैविक पद्धतीने संत्रा मोसंबी ही पिके कशी विकसित करावीत याचा मूलमंत्र देत फळपीक तज्ञ तथा किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबे पाटील यांनी पीक व्यवस्थापन चर्चासत्रात आज शेतकऱ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले.
स्थानिक राठी कृषी सेवा केंद्र येथील कॉम्प्लेक्समध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते यावेळी हिवरखेड परिसरातील खंडाळा ,चितलवाडी ,कारला ,सोनवाडी ,यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनेश कांबे यांनी अत्यंत सोप्या व अत्यल्प खर्चात संत्रा मोसंबी या पिकांचे व्यवस्थापन कसे करावे तसेच झाडांमध्ये फायटोपॅथोरा या बुरशीमुळे झाडे मोठ्या प्रमाणात मारतात याविषयी सुद्धा त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. या चर्चासत्र कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदन कास्तकार देविदास सांगूनवेडे हे होते तर प्रमुख उपस्थितीत विनयकुमार राठी हे होते या चर्चासत्रात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या पिकाबाबतच्या समस्यांचे दिनेश कांबे यांचे कडून माहिती घेऊन निराकरण केले व आभार मानले.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना साकडे घातले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनय कुमार राठी यांनी केले. कार्यक्रमासाठी विनयकुमार राठी ,सुनील राठी यांनी मोलाचे सहकार्य केले.


