प्रहार जनशक्ती पक्षाने दिले संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन
विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर /- चिमूर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायत अंतर्गत अपंग दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ मिळाला नसून मागील 5 वर्षांपासून दिव्यांग लाभार्थी या लाभापासून वंचित असल्यामुळे सदर लाभार्त्यांना येत्या 7 दिवसात निधी उपलब्ध करून वितरित करण्यात यावे अन्यथा नेरी ग्रामपंचायत समोर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा प्रहार जनसेवक पक्षातर्फे संवर्ग विकास अधिकारी यांना31 आगस्टला निवेदन देण्यात आले सदर दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीची तरतूद सरकारने केली असून ग्रामपंचायतीने हा निधी वित्त आयोग च्या आराखड्यात मंजूर केला असेल तर त्या निधीतून उपलब्ध करून लाभार्त्यांना वितरित केल्या जाते किंवा ग्रामपंचायत च्या सामान्य फडातून हा निधी उपलब्ध करुन लाभ दिल्या जाते किंवा ग्रामपंचायत या बाबत ठरविते ,दरवर्षी हा पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्ती ला वितरित करणे बंधनकारक आहे परंतु मागील पाच वर्षांपासून या निधीचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालाच नाही तेव्हा सदर ग्रामपंचायतीच्या हा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे अशीद अमरदीप मेश्राम आणि प्रवीण वाघे प्रहारसेवक यांनी सवर्ध विकास अधिकारी प स चिमूर यांना निवेदन दिले सदर ग्रामसेवका ला याबाबतीत अपंग दिव्यांगनी विचारले असता तुमाला काय पाहिजे ते लेखी अर्ज द्या नंतर आम्ही विचार करू असे सांगितले.