योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील वाढोणा ग्रामपंचायत कार्यालय येथे युवा जनकल्याण संस्था ब्रह्मपुरी व ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून नेत्र तपासणी शिबीर घेणे बंद होते.त्यामुळे येथील नागरिकांची नेत्र तपासणी झाली नसल्याने ही बाब लक्षात घेता सरपंच देवेंद्र गेडाम यांनी वाढोणा गट ग्रामपंचायत अंतर्गत सोनापूर तुकूम, लखमापूर, सावरला येथिल 67 नागरिकांची या शिबिरात तपासणी करण्यात आली. यामध्ये 31 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली. तर 18 नागरिकांच्या चष्म्याचे ऑर्डर देण्यात आले. या शिबिराची मोहीम सरपंच देवेंद्र गेडाम यांच्या नेतृत्वात पार पडली. या शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच देवेंद्र गेडाम, पंचायत समिती सदस्य श्यामसुंदर पूरकाम, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव मस्के, प्रदीप येसनसुरे, अनिल डोर्लीकर, रामेश्वर लंबेवार, ग्रा.पं. सदस्या मंगला बोरकर, रेश्मा सड माके, सरिता शेंडे, प्रियंका गंजेवार, मीनाक्षी कोमावार, शशिकला ठाकरे, उषा पाटील, आदी नागरिक उपस्थित होते. या शिबिराचा कार्यक्रम ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांमुळे यशस्वीरित्या पार पडला.











