योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपुर- अखिल भारतीय कांग्रेस कमिटी दिल्ली च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी च्या महासचिव पदी माजी आमदार तथा माजी मंत्री खनिकर्म महामंडळ महाराष्ट्र राज्य डॉ.अविनाश वारजूकर यांची निवड करण्यात आली. निवड झाल्याने काँग्रेस पक्षात नवचैतन्य प्राप्त झाले. त्यामुळे निवड झाल्यानंतर प्रथमच शंकरपूर नगरीत आगमन होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करण्याची योजना आखली त्यानुसार दि.३०.८.२०२१ ला शंकरपूर येथे आगमन झाल्यानंतर ढोल ताष्याच्या गजरात पंच आरतीने व मोठ्या हाराने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार वाहून आशीर्वाद घेतले यावेळी घरी त्यांनी छोटेखानी समारंभात काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचे आव्हान केले. यावेळी चिमूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष संजय घुटके, नागभीड तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, ज्येष्ठ काँग्रेस नेता धनराज मालके, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी सरचिटणीस विजय गावन्डे, महिला तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष सविता चौधरी, चिमूर तालुका काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष विजय डाबरे, राजू चौधरी, चिमूर पंचायत समिती सभापती लता पिसे, उपसभापती रोशन ढोक, पं. स. सदस्य भावना बावनकर, चिमूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले, शंकरपूर ग्रा. पं. सरपंच साईश वारजूकर, उपसरपंच अशोक चौधरी, संजय माकोडे, हरीश मुळे, प्रभाकर मेश्राम, बाळू बोभाटे, अविनाश अगडे, रहेमान पठाण, मांगली चे उपसरपंच देशमुख, नरेश वनकर,शंकरपूर ग्रा. पं. सदस्य नितीन सावरकर, माजीद शेख, निखिल गायकवाड, रंजना उईके, बेबीताई डहारे, वंदना सहारे, महादवाडी चे सरपंच भोजराज कामडी, साठगांव च्या उपसरपंच प्रीती दीडमुठे, कोल्हारीचे माजी सरपंच प्रज्वला गावंडे, कृषी उत्पन्न बा. स. सभापती नंदुजी गावन्डे, संचालक आमोद गौरकर, गोकुळ सावरकर, पवन राहूड, लक्ष्मण खेडेकर, लक्ष्मणजी खेडेकर, विलास पिसे, नवतळा सरपंच कुंडलिक मेश्राम, उपसरपंच तुळशीदास शिवरकर,अजय जंगीडवार, युवा कार्यकर्ते सौरभ जयस्वाल, लोकेश बावनकर, शुभम वनकर, अमित शिवरकर, अक्षय बावनकर, शुभम कामडी, संकेत तालेवार, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)