अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : कोरोना महामारी मुळे शाळा महाविद्यालय शासनाच्या आदेशानुसार बंद होती त्यामुळे पातुर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे स्व. समाधानजी ढोणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळा स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये शाळा-महाविद्यालयातील अनेक मुलांनी सहभाग घेऊन गीत गायन व वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धेत कोरोना महामारीने हरवलेले बालपण, ऑनलाइन शिक्षणाचे फायदे तोटे व जगणे कठीण होत आहे या अशा महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व केले तर गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेले गायन कौशल्य गायनाच्या माध्यमातून दाखवून दिली या स्पर्धेत वर्ग पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रीत्या वक्तृत्व केली व गायन केली त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन शाळा व संस्थेने सन्मानित केले सदर कार्यक्रमाला संस्थेच्याअध्यक्षा सपनाताई म्हैसने, सचिन सचिन ढोणे,संचालक पांडुरंग अरबाड, प्रल्हाद नीलखन,सुनील राखोंडे, प्रांजली कीर्तने,प्रशांत म्हैसने, डॉ.नवीनचंद्र देवकर प्राचार्य जयद्रथ कंकाळ आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.











