जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर दि.20 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट 29 ग्रामपंचायतीची जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील सभागृहामध्ये आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गावांच्या झालेल्या विकास कामांबद्दल तसेच प्रलंबित कामाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित जिल्हा कार्यकारी विनायक तौर व सर्व सहा तालुका समन्वयक यांनी स्वतःचे व आपल्या तालुक्यातिल समाविष्ट गावाबद्दल माहिती दिली. बैठकीत पुढील विविध विषयावर चर्चा आणि यामध्ये नरेगा मधून कामांचा VSTF गावांसाठी प्राधान्याने करावे. अभियानातील सर्व गावांना 100% कोविड लसीकरण झाले पाहिजे असे आरोग्य विभागास सूचना केल्या. महसूल विभागाच्या ई पिक पेरा योजनेला अभीयानातील गावांमध्ये प्रबोधन करून प्रभावीपणे राबवावे. कार्यकारी विनायक तौर ,तालुका समन्वयक व ग्रामसेवक उपस्थित होते.











