परिसरातील जनतेवर कोसळला दुःखाचा डोंगर
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातूर तालुक्यातील आलेगाव येथे गेल्या ३० वर्षा पासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करीत असतांना परिसरातील अनेक अत्यंत गरीब लोकांवर मोफत उपचार करणारे डॉ प्रमोद राऊत ह्यांच्यावर काळाने दि २८ रोजी झडप घालून जनतेतून हिरावून नेल्याने परिसरातील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथील डॉ प्रमोद जगन्नाथ राऊत हे गेल्या ३० वर्षा पासून वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक,राजकीय कार्यात नियमित अग्रेसर राहून घरच्या शेती उद्योगाला सांभाळीत रुग्णसेवेला आपले आद्य कर्तव्य समजून गेल्या दीड वर्षा पासून महामारीच्या काळा मध्ये आपले क्लिनिक बिनधास्त सुरू ठेऊन आलेगावातील रुगणांसह, परिसरातील शेकडो रुगणांना सेवा देण्याचे कार्य सुरूच होते.अशातच सदर आजाराचे संक्रमण वाढू नये म्हणून शासना कडून लॉक डाऊनचे फर्मान असल्याने परिसरातील अनेक छोटे व्यवसायिकां सह मजूर वर्गाची हातमजुरी थांबली त्यामुळे शेकडो गरीब लोकांकडे उपचारा करिता पैसा नसल्याने अनेक रुगणांवर डॉ प्रमोद राऊत मोफत औषधउपचार करायचे.कोरोना काळामध्ये डॉ राऊत यांनी आलेगावा सह परिसरातील शेकडो रुग्णाला हिम्मत देऊन रुग्णामध्ये आत्मविश्वास तयार करून वैद्यकीय सेवा द्यायचे.त्यामुळे शेकडो रुग्ण औषध व आत्मविश्वासाने बरे व्हायचे.निरंतर रुग्णसेवा देतांना स्वताच्या तब्बेत्तीच्या काळजी कडे दुर्लक्ष झाल्याने साहजिकच त्यांच्या तब्बेत्तीवर परिणाम झाला.आणि अस्वस्थ वाटायला लागल्याने,ते स्वता अकोला येथे खाजगी दवाखान्यामध्ये जवळपास वीस दिवस उपचार घेत सदरहू आजाराशी त्यांनी संघर्ष केला.परंतु काळाने आपला डाव साधत दि २८ रोजी डॉ प्रमोद यांचे देहावसन झाले.सदर वार्ता तालुक्यातील गावो गावी पसरताच आलेगावा सह परिसरातील जनतेवर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांच्या दुःखद निधनाने आलेगावातील खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या दवाखानेसह अनेक व्यवसायिकांनी आप आपले व्यवसाय सकाळपासून बंद ठेवले होते.तसेच डॉ प्रमोद राऊत यांच्या दुःखद घटनेच्या वार्ता मुळे गोर गरिबांच्या घरी चुलीच पेटवल्या गेल्या नाहीत.गोर गरिबांचा दाता हरवल्याने परिसरामध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.


