राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – महारोगी सेवा समिती वरोरा, महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवन यांच्या मिशन आनंद सहयोग अंतर्गत कौस्तुभदादा आमटे आनंदवन यांच्या कडून २०० राशन किट गरीब गरजू साठी अहेरी इथे हेल्पिंग हँड्स संस्था अहेरी कडे उपसरपंच आनंदवन तथा जनसंपर्क अधिकारी आनंदवन शौकत अली खान यांच्या हस्ते आज अहेरी येथे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी प्रशासनिक अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, प्रतिष्ठित नागरिक सुरेश बंडावार तथा हेल्पिंग हँड्स संस्था, विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समितीचे सर्व कार्यकर्ते, सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी मा.शौकत अली खान व आनंदवन चे फोटोग्राफर कुलसंगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एक किट जवळपास २ हजार रु किमतीची असून अश्या २०० किट या वेळी सुपूर्द करण्यात आल्या. हेल्पिंग हँड्स तर्फे या किट अहेरी परिसरातील अत्यंत गरजू परिवारापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात किट स्वरूपी मदत मिळवून देण्यासाठी आनंदवन च्या महिला कार्यकर्त्या साबिया खान यांचा मोलाचा वाटा आहे. या मदतीसाठी हेल्पिंग हँड्स संस्थे तर्फे विकास आमटे, कौस्तुभदादा आमटे तथा महारोगी सेवा समिती वरोरा चे हार्दिक धन्यवाद मानण्यात आले.