मोबाईल धारकांना मोबाईल केले परत
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल हरविल्याची शृंखला सुरू होती मात्र हरविलेल्या मोबाईलच्या शोध घेण्याकरता पातुर पोलिसांचा सतत प्रयत्न सुरू होता अखेर या प्रयत्नाला यश मिळाले आणि अर्जदारांना पातुर पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्यांना त्यांच्या रक्कम आणि मोबाईल परत करण्यात आले. 31 / 05 / 2021 रोजी मा पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांचे सूचना व आदेशान्वये पोलीस स्टेशन पातुर हद्दीतील मुद्देमाल व जे मोबाईल हरवलेले आहेत त्यांचा शोध घेऊन अर्जदारास परत देणे बाबत अशा आदेशान्वये मा हरीश गवळी ठाणेदार पोलीस स्टेशन पातुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल मनिष घुगे ब नं 345 सोबत होमगार्ड नाकट यांनी पोलीस स्टेशन पातुर यांनी हा उपक्रम पार पडला आहे पातुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हरवलेले मोबाइल बाबत शोध मोहीम राबवून 09 मोबाईलचा शोध घेऊन मोबाईल किंमत एकूण 107000 रु चा मुद्देमाल आज दि : 31 / 05 / 2021 रोजी पो स्टे ला येथे मिटिंग घेऊन हरीश गवळी पोलीस निरीक्षक पो. स्टे. पातूर यांचे हस्ते सदर मोबाईल अर्जदारास परत देण्यात आले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)