अकोला,दि.१७(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) २२२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २२२ अहवाल निगेटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.१६) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८०६(४३२१२+१४४१७+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य = एकूण पॉझिटीव्ह शून्य.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३१०१२६ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०६५५७ फेरतपासणीचे ४०१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१६८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३१००७४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६६८६२ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शून्य पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
एक मृत्यू
दरम्यान आज एका मुर्तिजापूर येथील ८० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेस दि.३ रोजी दाखल करण्यात आले होते,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
चार जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन तर आयकॉन रुग्णालयातील एक अशा चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
३० जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८०६(४३२१२+१४४१७+१७७)आहे. त्यात ११३६ मृत झाले आहेत. तर ५६६४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३० जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.