पिंजारी माहेमूद सर्कल प्रतिनिधी शहापूर
शहापूर:देगलूर तालुक्यातील सुंडगी येथे दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी नैतिक भीम क्रांती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गाव संविधान जागृती अभियानचा उत्साहात शुभारंभगाव करण्यात आला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा कालावधी तब्बल २ वर्षे ११ महिने १८ दिवसांचा असून, या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देत संविधानाविषयी जनजागृती करणे व प्रत्येक ग्रामपंचायतीस संविधानाची प्रत भेट देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.नैतिक भीम क्रांती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बालाजी कांबळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजाला एकत्र बांधण्याचे कार्य केले. त्याच विचारातून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य नागरिकांना आपले हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देणे हा संस्थेचा प्रमुख हेतू आहे.सुंडगी गावापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून ग्रामपंचायत कार्यालयात संविधानाची प्रत भेट देण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी गावचे उपसरपंच दिलीप पाटील यांच्यासह प्रकाश कांबळे, विठ्ठल कांबळे, संजय कांबळे, मारुती सोनकांबळे, रामा कांबळे, राजू कांबळे, अनिल कांबळे, यमुना कांबळे, संध्या कांबळे, इंदुबाई कांबळे, शांताबाई कांबळे, शाहूभाई कांबळे, कंबळबाई कांबळे, लालू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संविधान जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करत अभियानास शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात संविधानाविषयी जागरूकता वाढून समाजात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.









