ज्ञानदेव राजनकर तालुका प्रतिनिधी जळगांव जामोद
भेंडवळ मांडणी; ३५० वर्षांची ‘अक्षय’ परंपरा.. ही मांडणी, रविवार दिनांक १९ एप्रिल रोजीच्या सुर्यास्ताला मातीत रुजली, अन् सोमवार दिनांक २० एप्रिल च्या सुर्योदयाला भाकिताच्या रुपानं उगवली.. आज भेंडवळ मांडणी जाहीर झाली. या वर्षातले पीक-पाण्याचे अंदाज, नैसर्गिक प्रकोप-राजाची परिस्थिती अन्य सारीच भाकितं पुढं आलीत. साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविले गेले . वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणी जाहीर केली. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, देशाचा राजा,अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात आले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात.अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर घट मांडणी केल्यानंतर आज सोमवारला सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे.कपाशी पिक चांगले असल्याच भाकित भेंडवळची घटमांडणी येथे सांगण्यात आली.पिकेकापूस- चांगलेज्वारी पिक:-सर्वसाधारण भावात चांगलेतूर पिक: -अनिश्चितमुंग पिक: -सर्वसाधारणउडीद पिक :-रोगराईतीळ पिक :-चांगलेभादली :-रोगराई जास्तबाजरी पिक :-चांगलेतांदूळ पिक:- चांगलेमठ पिक सर्व- साधारणजवस् पिक:- नासाडीलाख पिक:- मोघमवाटाणा पिक:- अनिश्चितगहू पिक- साधारणहरबरा:-साधारण मोघमदेश संरक्षण..नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहील परकीय देशाचा त्रास राहील आर्थिक परिस्थिती वाईट राहीलपर्जन्यमान कसे असणार ?जून- कमीजुलै -साधारण जून पेक्षा जास्त ऑगस्ट- अतिवृष्टीसप्टेंबर-चांगला अवकाळी पाऊस.





