गोपाळकुमार कळसकर तालुका प्रतिनिधी, भुसावळ
भुसावळ : महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हनुमान मंदिर, खर्ची बु. (एरंडोल )येथे ‘कांताई नेत्रालय, आय केअर फॉर यू’यांच्या वतीने, समाजकार्य विभाग,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव व गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मोतीबिंदू शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व त्यांना योग्य औषधीपचार देण्यात आले. आवश्यक त्या रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. यावेळी क्रांतिसुर्य म. फुले व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन ज्येष्ठ नागरिक उत्तम इंधा माळी, पोलीस पाटील नाना माळी, अलकाबाई माळी व ललिता माळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश माळी यांनी केले, तर प्रास्ताविक प्रशांत सूर्यवंशी यांनी केले. आभार गजानन बोरसे यांनी मानले यावेळी महापुरुषांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.शिबिरामध्ये एकूण४४ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.निवड झालेल्या रुग्णांना कांताई नेत्रालय, जळगाव येथे विनामूल्य ने-आण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.२ रुग्णांवर फेको शस्त्रक्रिया व २ रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शिबिरातील रुग्णांनी मिळालेल्या अत्याधुनिक उपचारांबद्दल समाधान व्यक्त केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाजकार्य विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ चे प्रा. योगेश माळी, गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव चे प्रशांत सूर्यवंशी, समाजकार्य विभागाचे विद्यार्थी – गजानन बोरसे, रोहित पाडवी, शरयू पाटील, ललिता जोपळे, सुनिता बहिरम,हनुमान मंदिर समिती तसेच कांताई नेत्रालयाचे तज्ञ डॉक्टर आयुष जगताप व स्वयंसेवक कल्पेश माळी, भूषण म्हस्के, गोपाल मोपारी, रोशन महाजन, मुकुंदा माळी, भुषण माळी, देवेश मगरे, मधुकर विश्वे, नाना सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी या शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत कांताई नेत्रालय व आयोजकांचे आभार मानले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. “दृष्टिदान हीच श्रेष्ठ सेवा”* या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना नवी दृष्टी मिळाली.










