गोपाळकुमार कळसकर तालुका प्रतिनिधी, भुसावळ भुसावळ : जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यायंती साजरी करण्यात आली. यावेळी सिव्हिल हॉस्पिटल, जळगांव समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाबुराव वाघ, राजुभाऊ मोरे यांनी प्रार्थना म्हटली. या प्रसंगी श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी चे अध्यक्ष वसंतराव नेटके, चर्मकार विकास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ सावकारे,राज्य कार्यकारिणी सदस्य संजय वानखेडे सर, प्रदेश सहसचिव ॲड. चेतन तायडे, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष प्रकाश रोजतकर, जिल्हाध्यक्ष डॉ.अर्जुन भारुळे, कार्याध्यक्ष ॲड.राजेश वाडेकर, उपाध्यक्ष गजानन दांडगे सर, ज्ञानदेव भारुडे, पंकज तायडे, आत्माराम चिमणकर, श्रावण निंभोरे, कैलास वाघ सर, कुणाल तायडे, वेदांत विसपुते, डॉ.शंकरलाल सोनवणे आदी उपस्थितीत होते. या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. “शिका,संघटित व्हा,संघर्ष करा “हा मूलमंत्र अंगीकारण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांतर्फे करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय वानखेडे सर,विश्वनाथ सावकारे यांनी परिश्रम घेतले.










