व्याख्याते वसंत हंकारे यांच्या विचारांनी मरखेलकर भारावले
पिंजारी माहेमूद सर्कल प्रतिनिधी शहापूर
शहापूर : देगलूर तालुक्यातील मरखेल येथे महात्मा बसवेश्वर जयंती व अखंड शिवनाम सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत महाराष्ट्राचे प्रसिद्ध युवा व्याख्याते आणि समाज प्रबोधनकार मा. वसंत हंकारे सर यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘आई-बाप समजावून घेताना’ या विषयावर जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या या हृदयस्पर्शी व्याख्यानाने हजारो मरखेलकरांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. या भव्य सोहळ्याचे उद्घाटक म्हणून सरपंच गवाले साहेब, यांनी उपस्थित राहून आपले प्रबोधनात्मक विचार मांडले. यावेळी त्यांनी तरुणाईने महापुरुषांचे विचार आचरणात आणून आई-वडिलांची सेवा करणे, हाच खरा धर्म असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला बबन पाटील गोजगावकर, कैलास येजगे, संतोष पाटील,शिवराज पाटील माळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय स्तरावरून पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, पीएसआयपवार साहेब यांनीही उपस्थिती दर्शवली. गावातील प्रथम नागरिक सरपंच गवाले साहेब, संदीप पाटील, भरत पाटील, धुमाळे काका, लाखे सावकार, मच्छिन्द्र दादा गवाले, पपू रेड्डी, हांडे सर यांच्यासह पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध संस्थांचे चेअरमन आणि अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मरखेल येथील तरुण युवा मित्रांनी या कार्यक्रमाचे अतिशय देखणे आणि शिस्तबद्ध नियोजन केले होते. या सोहळ्यासाठी गावातील महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. वसंत हंकारे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कौटुंबिक मूल्ये आणि आई-वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले, ज्याला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मशाल क्रांतीच्या या विचारांनी मरखेलमध्ये एक वेगळीच सामाजिक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.










