गोरेगांव बु येथे बुद्धवंदना,पुस्तके वाटप
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
आज आपण ज्या शुध्द ऑक्सिजन वायू साठी झगडतोय तोच वायू हा वृक्षापांसून आपणास मिळतो. आपण शुल्लक कारणासाठी जंगले नष्ट केलीत. शेतातील व गावा शेजारची वृक्षतोड करून पर्यावरणाचा आपण ऱ्हास केला त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे.रोगराईच्या साथी पसरल्या आहेत.त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. त्यावर उपाय म्हणजे आपण वृक्ष लागवड केली पाहिजे.नुसतेच वृक्षारोपण करणे महत्वाचे नसून वृक्ष जतनही झाले पाहिजे..हा हेतु ठेऊन नुतन सोशल फाऊंडेशन गोरेगाव बु !! यांनी आज बुध्द पौर्णिमे निमित्त तिस झाडे लावून ती झाडे जगवण्याचा संकल्प केला आहे. या आयोजित उपक्रमांतर्गत कडूनिंब , वड , पिंपळ , बेहडा , चिंच ,कडु बदाम,आवळा अशीच झाडे लावली आहेत.बुध्द पौर्णिमा असल्यामुळे सुत्रपठन आणी वंदनेच्या पुस्तिकेचेही वाटप यावेळी नुतन सोशल फाऊंडेशन कडुन करण्यात आले आहे.
तथागत बुध्दांची जवळपास सर्वच प्रवचने ही निसर्गाच्या सानिध्यातच झालेली आहेत. उदा,वेळूवन , आम्रवन वेगैरे म्हणूनच बुध्द पौर्णिमेला वृक्षारोपण आणी त्यांचे जतन त्याच बरोबर शील संवर्धनही झाले पाहिजे असे मत नुतन सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.संघदिप शेगांवकर ह्यांनी व्यक्त केले आहे.तसा संकल्पही त्यांनी,नुतन च्या पदाधिकारी,कार्यकर्ते व सहकार्यांनी केला आहे.
या उपक्रमात गौतम शेगांवकर, आकाश शेगांवकर ग्राम पं.सदस्य, कुलदिप शेगांवकर,प्रविण शेगांवकर, अनुप शेगांवकर, कुणाल शेगांवकर , संतोश सोनोने, आशिष प्र.शेगांवकर, सुधिर शेगांवकर, रवी शेगांवकर, मयुर सा.शेगांवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तर अजय शेगांवकर पं.स.सदस्य अनंता हांडे,विकास प्रधान,संतोश दंदी,अमोल शेगांवकर गणेश काळींगे,बंटी शेगावकर तसेच गावचे समस्त लोकप्रतीनिधी, पदाधिकारी व अन्य गावकरी सोशल डिस्टंसिंगचे पालन करित उपस्थीत होते.