राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – येथील आदिवासी विद्यार्थी संघटनेचे तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात शनिवारी अहेरी नगर पंचायतीच्या विरोधात शवयात्रा काढण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाने अटकाव करून आविस कार्यकर्त्यांवर अहेरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केले आहे.
कोविड 19 कोरोना विषाणूजन्य साथरोगाचा प्रादुर्भाव चालू असल्याने जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे दिनांक 3/08/2021 पासून पुढील आदेशापर्यंत जमावबंदी व टाळेबंदी तसेच 30/07/2021 ते 13/08/2021 पावेतो जिल्ह्यात कलम 37(1) (3) मपोका लागू असतांना सदर आदेशाचे उल्लंघन करून रोडवरील खड्डे बुजविण्याचे कारणावरून नगर पंचायत अहेरीच्या निषेधार्थ प्रेताचा प्रतिबंधात्मक पुतळा तयार करून तिरडीवर ठेऊन शवयात्रा काढल्याने अप क्रमांक 2021 कलम 188 भादवी सह कलम 135 म.पो.का.नुसार आविसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे दस्तुरखुद्द अध्यक्षच नियमांचे उल्लंघन केल्याने व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पायमल्ली केल्याने आविसच्या आंदोलनाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना विचारले असता, निवेदन कर्त्यांनी मुळात जे निवेदन दिले ते नगर पंचायत अंतर्गत येणारे रस्त्याचे नव्हते, तर उल्लेख केलेले रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे होते, नगर पंचायत अंतर्गत आझाद चौक ते दानशूर चौक पर्यंतचा रस्त्याचे काम सुरू असून प्रगतीपथावर आहे.
-अजय साळवे, मुख्याधिकारी न.पं. अहेरी
यात पेरमिली येथील प्रमोद आत्राम, तानबोडी येथील अशोक येलमुले, मिलिंद अलोने अहेरी, चंद्रकांत बेझलवार आलापल्ली, प्रज्वल नागुलवार एटापल्ली, प्रशांत गोडसेलवार अहेरी, साईनाथ ओतकार अहेरी, विलास गलबले अहेरी, अशोक पेंदाम इंदाराम, इबेन शेख अहेरी, सुनीता कुसनाके टेकुलगुडा, सुरेखा आलाम, रेपनपल्ली आदी व अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले.