सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
हिवरा आश्रम येथून जवळच असलेले श्रीक्षेत्र ओलांडेश्वर याठिकाणी आज श्रावण महिन्यातील पहिली अमावश्या या पर्वावर भाविक भक्तांनी दर्शनासाठी ओलांडेश्वर कडे धाव घेतली होती. ओलांडेश्वर हे एक महादेवाचे जागृत देवस्थान असून येथे अमावस्या- पौर्णिमा, महाशिवरात्री, व इतरही सणाच्या पर्वावर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक फक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येथे येत असतात. अशाच प्रकारे आज 8 ऑगस्ट रविवारला श्रावण महिन्यातील पहिले अमावश्या यानिमित्ताने भाविक भक्त दर्शनासाठी आले असता श्री ओलांडेश्वर संस्थान चे अध्यक्ष व पंचकमिटी यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करीत अतिशय शिस्तबद्ध व नियोजन सिर पद्धतीने भाविकांचा हिरमोड न होता कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनाचा लाभ दिला. श्रीक्षेत्र जवळ भाविक भक्तांना कोरोना चे नियमाप्रमाणे दर्शन देण्यासाठी अध्यक्ष यांच्यासह वीस सेवेकरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजर राहून सेवा दिली.