विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर /-विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न संपविण्यासाठी बेरोजगारांच्या रोजगारासाठी वीज व स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भस्तरीय बेमुदत ठिय्या आंदोलन 9 आगस्त ला नागपूर येथे होणार आहे त्या अनुषंगाने चिमूर येथील विश्रामगृह येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर च्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते
विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर च्या वतीने आयोजित सभेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरवात करण्यात आले या सभेला अध्यक्ष म्हणून किशोर दहेकर जी अध्यक्ष वि रा आ प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रमेशकुमार गजभे माजी आमदार डॉ हेमांतजी ईसनकर संयोजक वि रा आ सुदाम राठोड युवा अध्यक्ष अण्णाभाऊ आवळे उपाध्यक्ष प्रीतिताई दीडमुठे महिला अध्यक्ष नागपूर मोरेश्वर झाडे ईश्वर पाटील सचिन गेडाम धर्मदास गेडाम सारंग दाभेकर धर्मपाल मोटघरे उपस्थित होते या सभेला संबोधित करताना अनेक मान्यवरांनी विदर्भाच्या वेगळ्या राज्याची गरज समस्या आणि 9 आगस्टला होणाऱ्या नागपूर ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न वीज वितरण चे अवाढव्य बिल बेरोजगारी विदर्भ तील उद्योग शासकीय नोकरीतील अनुशेष विदर्भ राज्य लोक सेवा आयोग या अश्या अनेक मुद्यावर आपले मत व्यक्त केले तसेच 9 आगस्टला नागपूर येथील ठिय्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यात या सभेमध्ये 500 च्या वर चिमूर तालुक्यातील विदर्भवादी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असा आशावाद प्रशांत डवले युवा अध्यक्ष चिमूर वि रा आ ने बोलून दाखविला या सभेला प्रवीणजी निशाणे, ता.उपाध्यक्ष,विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर, आदित्यजी पिसे, मंगेशजी शेंडे, प्रविनजी दिडमुठे, सुरजजी तिसरे, प्रतिभाताई सेलेटकर, पुष्पाताई सावसाकडे, शीतलताई सोरदे, ज्योतीताई बावनकर, विशालजी इंदोरकर, सुशांतजी इंदोरकर, कैलासजी भोयर, प्रेमदासजी वासनिक, बाबारावजी नन्नावर, आदी विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. ही सभा प्रशांत डवले युवा आघाडी अध्यक्ष वि रा आ समिती चिमूर यांच्या नेतूत्वात आयोजित करण्यात आली होती