माती परीक्षण करून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा दिला मंत्र.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या उसेगाव येथिल शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिदूत हितेश गायकवाड यांनी दिले शेती कसण्याचे धडे आणि माती परीक्षण करून रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल अपव्यय खर्च कसा टाळता येईल यावर मार्गदर्शन केले. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कॉलेज ऑफ अग्रीकलचर कोंघारा येथील विद्यार्थी आणि कृषिदूत हितेश गायकवाड यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत चिमूर तालुक्यातील उसेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती विषयक मार्गदर्शन केले. यात त्यांनी सांगितले की शेती कसताना आणि भरघोस उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी पैश्याचा अपव्यय टाळण्यासाठी जमिनीची तपासणी माती परिक्षणाचा सल्ला दिला त्यामुळे शेतात कोणते कंटेंट कमी आहेत. याची माहिती मिळेल यासाठी शेतातील कुठली माती घ्यायची कुठल्या ठिकाणची घ्यायची आणि माती परीक्षणाला कुठे पाठवायची याची शास्त्रशुद्ध माहिती बांधावर जाऊन दिली. उसेगाव व परिसर हा कापूस सोयाबीन आणि धान पिकासाठी प्रसिद्ध आहे येथील शेतकरी जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत असून दिवसे ने दिवस उत्पन्न कमी होत आहे. जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे तेव्हा रासायनिक खते वापरू नये असा सल्ला देण्यात आले या कार्यक्रमाला शिगाल पाटील, निखिल चाफले, अजाबराव ननावरे, हिमांशू दांडेकर, मनीष ननावरे, जगनाथ चाफले आदी सर्व शेतकरी उपस्थित होते.


